Ad will apear here
Next
‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘ललित २०५’
मुंबई : कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ‘ललित २०५’ ‘स्टार प्रवाह’ घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका सहा ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.

पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. या कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे दुर्मिळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या आजीची धडपड असलेले कथानक हे या मालिकेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

‘अग्निहोत्र’नंतर बऱ्याच वर्षांनी सुहास जोशी ‘स्टार प्रवाह’ची मालिका करत आहेत. या मालिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या ‘ही एक कौटुंबिक मालिका आहे. मी साकारत असलेली आजी तुम्हाला तुमच्या आजीची नक्कीच आठवण करून देईल याचा मला विश्वास आहे.’

या मालिकेविषयी ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर म्हणाल्या, ‘स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपली सतत धडपड असते. शर्यतीत अव्वल राहण्याच्या प्रयत्नात आपण आपली नाती मात्र विसरत चाललोय. याच विसर पडलेल्या नात्यांची आठवण करून देणारी ही मालिका असेल.’

आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. बांदेकर यांचा सुपुत्र सोहम या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. ‘ललित २०५’मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे. शिरीष लाटकर या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणसाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYEBR
Similar Posts
‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ मुंबई : नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका सहा ऑस्टपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली आहे. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित...
‘ललित २०५’ने गाठला १०० भागांचा टप्पा मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ललित २०५’ या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. या प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी सेटवर हजेरी लावत कलाकारांसोबत आनंद साजरा केला.
‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू मुंबई : आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असते, प्रेमाची भावना गुलाबी असते, असे दाखवण्यात आले. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू ‘स्टार प्रवाह’ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेतून मांडणार आहे
अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन मुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language